Ad will apear here
Next
सरहदच्या वतीने जम्मू-काश्मीर चित्रपट महोत्सवाचे आयोजन

पुणे : ‘गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त| हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त’ म्हणजे पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथे आहे. अशा शब्दात ज्याचे वर्णन केले जाते त्या जम्मू-काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याने कायमच पर्यटकांसह चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांनाही भुरळ घातली आहे. त्यामुळे अनेक चित्रपट या पृथ्वीवरच्या नंदनवनात चित्रित झाले आहेत. हे नाते अधिक दृढ व्हावे या उद्देशाने सरहद संस्थेने राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्या सहकार्याने पुण्यात चार ते सहा फेब्रुवारी दरम्यान जम्मू-काश्मीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. 

काश्मीरविषयी आणि कश्मीरी कलाकार असलेले चित्रपट यात दाखवले जाणार आहेत. यामध्ये ‘कश्मीर की कली’सारख्या जुन्या चित्रपटांसह नवीन चित्रपटही दाखविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात हा महोत्सव होणार असून, यासाठी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सतपाल मलिक, त्यांचे सल्लागार खुर्शिद अहमद गनाई, काश्मीरमध्ये मल्टीप्लेक्स उभारणारे विजय धर यांच्यासह चित्रपट निर्माते, कलाकार उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती या महोत्सवाचे संचालक मुश्ताक अली आणि सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी एका पत्रकाद्वारे दिली. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZJABW
Similar Posts
जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढण्याची अपेक्षा पुणे : ‘काश्मीरचे पर्यटन आता सुरक्षित असून, यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढण्याची अपेक्षा आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील नागरिकांची आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही खास पुणेकरांना
पर्यटकांना जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेची ग्वाही पुणे : ‘जम्मू-काश्मीर पर्यटकांसाठी अत्यंत सुरक्षित असून, त्यांना कोणताही धोका पोहोचणार नाही, याची दक्षता सरकार आणि पर्यटन व्यावसायिकही घेत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी निर्धास्तपणे जम्मू-काश्मीरला यावे,’ असे आवाहन जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाचे संचालक निसार ए. वाणी यांनी पुण्यात केले.
‘काश्मिरी तरुणांशी संवाद साधणे महत्त्वाचे’ पुणे : ‘कलम ३७० रद्द केल्यांनतर आता जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी प्रभावी धोरण असणे गरजेचे आहे. योग्य राजकीय माध्यमे वापरून काश्मिरी तरुणांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्यातील महत्त्वाकांक्षा जाणून घेऊन संवादातील दरी कमी करणे आता महत्त्वाचे ठरेल,’ असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हूडा यांनी केले
नृत्यविषयक ‘संचारी’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुणे : नृत्यविषयक चित्रपट, लघुपट, माहितीपट यासह या क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी येत्या शनिवारी,१६ फेब्रुवारी व रविवारी १७ फेब्रुवारी २०१९ रोजी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘लाउड अॅपलॉज डान्स मॅगझिन’ प्रस्तुत ‘संचारी’ या दोन दिवसीय नृत्यविषयक चित्रपट महोत्सवाचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language